Rain Update : तो पुन्हा धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुढील ४८ तास धोक्याचे…
Rain Update : पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे, आज हवामान विभागाकडून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे.
कोकणात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, कोकणात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Rain Update
दरम्यान, मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रत देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.