Rain Update : आजपासून पुढील काळात पाऊस कसा असणार? पंजाबराव डख यांनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या…
Rain Update : सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायबच होता. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब रावांनी सप्टेंबर मध्ये पाऊस मैदान गाजवणार असे म्हटले होते.
झालं देखील तसंच सप्टेंबर ची सुरुवात झाली आणि पावसाने गिअर ओढला. अहो, जिथं जुलैमध्येही चांगला पाऊस झाला नव्हता, ऑगस्टमध्ये ही समाधानकारक पाऊस नव्हता त्या भागातही सप्टेंबरच्या दोनच दिवसात पावसाने दाणाफान उडवली.
तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात झाली. पंजाबरावांनी 31 ऑगस्ट च्या आपल्या अंदाजात मराठवाड्यातील नांदेड, परभणी कडून पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असे म्हटले होते.
यानुसार पावसाने मराठवाड्याकडून सुरुवात केली आणि पाहता-पाहता संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. हा मुलुख अगदीच पायदळी तुडवला. यामुळे मात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले.अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे चार तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण, पावसाचा जोर आजपासूनच कमी होणार आहे. आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार असा अंदाज दिला आहे. आता पंजाब रावांनी देखील तसेच संकेत दिले असल्याने यंदा सप्टेंबरमध्येही आणि ऑक्टोबरमध्येही चांगला पाऊस होईल असे चित्र तयार होत आहे.
सात सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. या काळात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप राहील आणि जोरदार पाऊस गायबच राहणार आहे. परंतु तदनंतर म्हणजेच 8-9 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. Rain Update
महत्त्वाचे म्हणजे ८-९ सप्टेंबरला जो पाऊस राहील तो पाऊस मोसमी पाऊसचं राहणार आहे. परतीचा पाऊस राहणार नाही. यानंतर त्यांनी १२-१३ सप्टेंबरला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे पंजाब रावांच्या अंदाजावरून यावर्षी परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होणार असे दिसत आहे.