Rain Update : पुढील दोन दिवस महत्वाचे! राज्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, पुणे हवामान खात्याकडून अलर्ट जारी…
Rain Update : मॉन्सूनने राज्यात प्रगती केली आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. आता या पावसाबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात मान्सून सक्रिय झाला आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत जोरदार पाऊस सुरू आहे.
तासाभराच्य पावसानेच येथे पाणी साचलं आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस होईल.
अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाह यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. Rain Update
दरम्यान, कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस होईल. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाह यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहिल अशी शक्यता आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जोरदार पाऊस होणार असल्याने अशा वेळी नागरिकांनी झाडाखाली थांबू नये असे आवाहन करण्यात आले आहे.