Rain Update : गणपती बाप्पा आज पाऊसही घेऊन येणार, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा…


Rain Update : महाराष्ट्रामध्ये मुंबई-पुण्यासह अनेक शहरांत गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. आज पासून राज्यात सर्वत्र गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे.

गणरासोबतच आज राज्यात पाऊस देखील हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. आजपासून पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर राज्यातील बहुतांश भागांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्याला, तसेच संपूर्ण विदर्भाला ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला ८ आणि ९ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Rain Update

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला ७ ते ९ सप्टेंबर या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने निवृत्त हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदा मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर मात्र, त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!