राज्यात पाऊस कायम, पुढील पाच दिवस काळजी घ्या, गारपीटही होणार..

पुणे : सध्या राज्यात उन्हाळा असला तरी पाऊस पडत आहे. राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने हजेरी लावल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे.
पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. उन्हाच्या झळा आणि उकाडा अनुभवायला मिळत असल्या तरी, कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर आला आहे.
आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Views:
[jp_post_view]