Rain : गणपती बाप्पा पाऊस घेऊन आला! या ठिकाणी धो- धो कोसळणार, जाणून घ्या…

Rain मुंबई : राज्यभरात सध्या गणपतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi) राज्यात अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्येच आता पावसाने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Rain)

आज सकाळपासूनच मुंबई, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यामध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तासांमध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rain) येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसेल. सध्या मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे थेट परिणाम कोकणात पाहायला मिळत आहेत.

ज्यामुळे कोकणातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे, तर तिथं सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरही अशीच परिस्थिती असेल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी पावसाची सुरुवात काहीशी उशिरा झाल्यामुळं त्याच्या परतीचा मुहूर्तही लांबणीवर पडला आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढच्या पाच दिवसांसाठी मुक्कामी असणारा पाऊस आतता थेट दसऱ्यानंतर माघारी फिरणार आहे असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
परिणामी राज्यातून पावसाच्या परतीची प्रक्रिया १४ ते १५ ऑक्टोबरनंतर सुरु होऊ शकतो. त्याच्या या प्रवासाला साधारण ऑक्टोबर अखेरीसच वेग येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं हा पाऊस इतक्यात पाठ सोडणार नसून या न त्या कारणानं तो आपल्यावर धडकणार आहे हेच खरे आहे.