तिकिट बुकिंगवर रेल्वेची मोठी अपडेट! १ मार्चपासून ‘हा’ जुना नियम बंद, या ॲपवर मिळणार सर्व सुविधा…

पुणे : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये बदल केले आहेत. १ मार्चपासून रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. जर तुम्ही आधी जुन्या अॅपमधून आपल्या मोबाइलवर जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट घेत असाल, तर आता ती प्रक्रिया बदलणार आहे.

आता प्रवाशांना जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि इतर प्रवासाशी संबंधित सुविधा एकाच ॲपमधून मिळतील, जेणेकरून तिकीट बुकिंग अधिक सोपी
आणि जलद होईल. भारतीय रेल्वे आपली टिकिटिंग प्रक्रिया आणखी स्मार्ट करत आहे.
दररोज लाखो प्रवासी मोबाईलवरून जनरल तिकीट बुक करतात आणि आता त्यांना यामध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. रेल्वे वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करण्याची झंझट संपवत आहे. आता सर्व तिकीट बुकिंग सेवा एका नवीन अॅपमध्ये उपलब्ध असतील. त्यामुळे तुमच्यासाठी या नव्या अॅपची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे तिकीट कोणत्याही अडचणीशिवाय सहज बुक करू शकता.

सेवा एकाच ठिकाणी…
RailOne ॲप वापरून प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्समध्ये जाऊन तिकीट बुक करण्याची गरज राहणार नाही. या ॲपमध्ये जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, आरक्षित सीट किंवा बर्थ बुकिंग, ट्रेनची लाईव्ह स्टेटस व लोकेशन तसेच प्रवासाशी संबंधित इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया आधीपेक्षा सुलभ होईल आणि वेळ वाचेल.
UTS ॲप बंद होण्याने IRCTC किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करण्याची गरज संपणार आहे. RailOne ॲप सर्व तिकीटिंग काम एकाच ठिकाणी करते, त्यामुळे प्रवाशांना ॲप बदलण्याची त्रासदायक प्रक्रिया टाळता येईल. यामुळे तिकीट बुकिंग आता अधिक जलद आणि सुरक्षित होईल.
ॲपवर जनरल तिकीट कसं बुक करणार?
RailOne ॲपउघडा आणि Journey Planner वर जा. “Unreserved” पर्याय निवडा, नंतर From Station आणि To Station मध्ये प्रवासाचे स्टेशन टाका. GPS ऑन करून ॲपपला तुमचे लोकेशन तपासू द्या. Mail, Express आणि Superfast ट्रेनसाठी तिकीट बुक करा. सर्व माहिती योग्य आहे की नाही ते तपासल्यानंतर पेमेंट पूर्ण करा. तिकीट पाहण्यासाठी My Tickets सेक्शनमध्ये जा आणि PDF डाउनलोड करून ठेवता येईल.