Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीच्या काळात रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या….

Railway News पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अमरावती-पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान उत्सव विशेष मेमू रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या दोन गाड्यांच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत.
तसेच अमरावती-पुणे मेमू गाडी क्रमांक ०१२०९ विशेष मेमू अमरावती येथून ०५ ते नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० विशेष मेमू पुणे येथून ०६ ते २० नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल.
या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, उरुळी, हडपसर आणि पुणे येथे थांबा आहे. गाडीला आठ कार मेमू रेक राहणार आहे. Railway News
बडनेरा-नाशिक मेमू गाडी क्रमांक ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून दि. ०६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी १९.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ०६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज २१.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. Railway News
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक येथे थांबे आहेत. या दोन विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना विशेष सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.