Railway News : बंगळुरू विभागावरील ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही गाड्या प्रभावित, जाणून घ्या…
Railway News : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागातील साई पी निलयम- बसमपल्ले स्टेशन दरम्यान रेल्वे किमी 21/552-786 वर असलेल्या बोगदा ब्रिज क्र. 65A जवळ ट्रॅफिक , पॉवर ब्लॉक घेऊन रॉक बोल्टिंग, ड्रेनेज जाळी, ग्राउटिंग इत्यादी विविध कामे करून अनलाइन क्षेत्राचे पुनर्वसन केले जाईल.
हे काम दिनांक 08.12.2023 ते 08.02.2024 पर्यंत एकूण 63 दिवस चालणार आहे म्हणून काही गाड्या वळविलेल्या मार्गावर धावतील. Railway News
तपशील खालीलप्रमाणे…
1. दिनांक 08.02.2024 पर्यंत बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक 11302 बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उद्यान एक्स्प्रेस पेनुकोंडा – नागसमुद्रम – धर्मावरम या बदललेल्या मार्गाने धावेल व साई पी निलयम स्टेशनवर जाणार नाही.
2. दिनांक 23, 30 डिसेंबर 2023 आणि 06, 13, 20, 27जानेवारी आणि 03 फेब्रुवारी 2024 रोजी तिरुअनंतपुरम येथून दर शनिवारी सुटणारी गाडी क्रमांक 16332 तिरुअनंतपुरम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस तिरुपती – जोलारपेट्टे – रेनिगुंठा – गुंतकल या बदललेल्या मार्गाने धावेल व यामुळे बंगारपेट, कृष्णराजपुरम, हिंदूपूर, धर्मावरम आणि अनंतपूर स्टेशनवर जाणार नाही.
3. दिनांक 08.02.2024 पर्यंत कोईम्बतूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सालेम – जोलारपेटे – रेनिगुंथा – गुंतकल या बदललेल्या मार्गावर धावेल व यामुळे धर्मपुरी, होसूर, बेंगळुरू कॅंट, बेंगळुरू, गौरीबिदनौर, साई पी निलयम, धर्मावरम आणि अनंतपूर स्टेशनवर जाणार नाही.
4 दिनांक 07.02.2024 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस धर्मावरम – नागसमुद्रम – पेनुकोंडा या वळवलेल्या मार्गे धावेल त्यामुळे साई पी निलयम स्टेशनवर जाणार नाही.
5 दिनांक 17, 24, 31 डिसेंबर 2023 आणि 7, 14, 21, 28 जानेवारी आणि 04 फेब्रुवारी 2024 रोजी दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक 16331 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – तिरुवनंतपुरम एक्सप्रेस जोलारपेटे – तिरुपती या बदललेल्या मार्गाने धावेल व यामुळे हिंदूपूर, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्टेशनवर जाणार नाही.
6 दिनांक 07.02.2024 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस – कोईम्बतूर एक्स्प्रेस गुंतकल-रेनिगुंठा-जोलारपेटे-सालेम या बदललेल्या मार्गाने धावेल त्यामुळे अनंतपूर, धर्मावरम, साई पी निलयम, हिंदूपूर, गौरीबिदनूर, बेंगळुरू कॅंट, बेंगळुरू, होसूर आणि धर्मपुरी स्टेशनवर जाणार नाही.
7 दिनांक 24, 31 डिसेंबर 2023 आणि 7, 14, 21 व 28 जानेवारी 2024 रोजी बेंगळुरूहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस,यशवंतपूर – अर्सिकेरे – हुबळी या वळवलेल्या मार्गाने धावेल व यामुळे हिंदूपूर, धर्मावरम , अनंतपूर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोप्पल आणि गदग स्टेशनवर जाणार नाही.
8 दिनांक 22, 29 डिसेंबर 2023 आणि 5, 12, 19 व 26 जानेवारी 2024 रोजी बेंगळुरूहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16532 बेंगळुरू – अजमेर एक्स्प्रेस यशवंतपूर – अर्सिकेरे – हुबळी या वळवलेल्या मार्गाने धावेल व यामुळे हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोप्पल आणि गदग स्टेशनवर जाणार नाही.
9 दिनांक 22, 29 डिसेंबर 2023 आणि 5, 12, 19 व 26 जानेवारी 2024 रोजी कोईम्बतूरहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर – राजकोट एक्सप्रेस सेलम – तिरुपती – जोलारपेटे – रेनिगुंठा – गुंतकल या वळवलेल्या मार्गाने धावेल यामुळे बंगारपेट, कृष्णराजपुरम, हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर आणि गूत्ती स्थानकांवर जाणार नाही.
10 दिनांक 17, 24, 31 डिसेंबर 2023 आणि 07, 14, 21 आणि 28 जानेवारी 2024 रोजी तुतीकोरीनहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 19567 तुतिकोरिन – ओखा एक्सप्रेस सालेम – जोलारपेट्टई – रेनिगुंठा – गुंतकल या वळवलेल्या मार्गाने धावेल यामुळे बंगारपेट, कृष्णराजपुरम, येलहांका, हिंदूपूर, धर्मावरम आणि अनंतपूर स्थानकांवर जाणार नाही.
11 दिनांक 18, 25 डिसेंबर 2023 आणि 01,08,15, 22 व 29 जानेवारी 2024 रोजी अजमेरहून दर सोमवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16531 अजमेर – बेंगळुरू एक्सप्रेस हुबळी – अर्सिकेरे – यशवंतपूर या बदललेल्या मार्गाने धावेल त्यामुळे गदग , कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्टेशनवर जाणार नाही.
12 दिनांक 20, 27 डिसेंबर 2023 आणि 03,10,17,24 व 31 जानेवारी 2024 रोजी जोधपूरहून दर बुधवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16533 जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस हुबळी-अर्सिकेरे- यशवांपुर या वळवलेल्या मार्गाने धावेल व यामुळे गदग ,कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्टेशनवर जाणार नाही.
13 दिनांक 17, 24, 31 डिसेंबर 2023 आणि 7, 14, 21 28 जानेवारी 2024 रोजी राजकोटहून दर रविवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 16613 राजकोट-कोइम्बतूर एक्स्प्रेस, गुंतकल-रेनिगुंठा-जोलारपेट्टे- तिरुपती – सालेम या बदललेल्या लेल्या मार्गाने धावेल व यामुळे गूत्ती, अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्थानकावर जाणार नाही.
14 22, 29 डिसेंबर 2023 आणि 05, 12, 19, 26 जानेवारी 2024 रोजी ओखाहून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक 19568 ओखा- तिरुनेलवेली एक्स्प्रेस , गुंतकल- रेनिगुंठा- जोलारपेट- सालेम या बदललेल्या मार्गाने जाईल व यामुळे अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, येलहांका, कृष्णराजपुरम आणि बंगारपेट स्थानकांवर जाणार नाही.