Railway News : पुणे-अमरावती विशेष रेल्वे ऐनवेळी झाली रद्द, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची उडाली तारांबळ..


Railway News : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची असून खास दिवाळीनिमित्त सुरू करण्यात आलेली पुणे-अमरावती ही विशेष गाडी ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. पुण्यावरून अमरावतीला येणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी रेल्वेकडून गाडी रद्द झाल्याचा मेसेज आला आहे. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

पुण्यात राहणाऱ्या हजारो अमरावतीकरांना दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी खास सुविधा व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं १० नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुणे-अमरावती-पुणे ही विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या गाडीच्या एकूण १८६ फेऱ्या होणार होत्या. Railway News

मात्र शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावर या गाडीन घरी परत येण्यासाठी प्रवासी पोहोचले असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक अपरिहार्य कारणामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचा मेसेज आला.

या मेसेजमुळं प्रवासी प्रचंड हादरले. या गाडीसाठी घोषित करण्यात आलेल्या सर्वच फेऱ्या आता रद्द करण्यात आल्यानं रेल्वे प्रशासनावर प्रवाशांचा प्रचंड रोष उफाळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्याहून अमरावतीसाठी घोषित करण्यात आलेली ही विशेष रेल्वे उरळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथून अमरावतीला पोहोचणार होती.

तसेच दिवाळीनंतर अनेकांनी या गाडीने पुण्याला परत जाण्यासाठी आपलं तिकीट आरक्षित केले होते. मात्र ही गाडी आता रद्द करण्यात आल्यामुळं खानदेश, पश्चिम विदर्भातील प्रवासी चांगलेच अडचणीत आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!