Railway News : दिवाळीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवासाचे टेन्शन मिटणार, राज्यातून धावणार ५७० विशेष गाड्या, जाणून घ्या…

Railway News : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून ५७० विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी ४२ सेवा आधीच सुरू झाल्या आहेत.
दिवाळीसाठी धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य बोगींच्या संमिश्र रेल्वेगाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.
दिवाळी, छटपूजा विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर येथून देशभरातील विविध ठिकाणी चालवल्या जात आहेत. ५७० दिवाळी स्पेशल पैकी १०८ सेवा महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी असणार आहे. Railway News
दरम्यान, महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आणि इतर ठिकाणी ३७८ सेवा चालवत आहे. तसेच ३७८ सेवांपैकी १३२ सेवा मुंबईतून, १४६ सेवा पुण्यातून आणि उर्वरित इतर ठिकाणांहून मध्य रेल्वेवर चालविल्या जात आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील प्रवाशांची दिवाळीत सोय होणार आहे.
महाराष्ट्रातून दक्षित भारतात देखील काही गाड्या चालवण्यात येत आहेत. दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरू आणि इतर स्थानकांसाठी विविध ठिकाणी ८४ सेवा चालवत आहे. त्यात नाशिक रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे.