मंत्री कदमांच्या’ सावली बार ‘वर धाड ; 22 बारबाला आणि 25 ग्राहक ताब्यात ; एफआयआर मधून माहिती समोर


पुणे : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरील बारवर कारवाई झाल्याचा दावा शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे.बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २२ बारबाला आणि २५ ग्राहकांना अटक केली आहे. त्यामुळे शिंदे सिनेचा हा नेता अडचणीत सापडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बारचा आढावा घेतला असता. या आढाव्यात एफआयआरची कॉपी हाती लागली आहे. या एफआयआर मध्ये असलेल्या नोंदी पुढील प्रमाणे –

३० मेच्या रात्री मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवलीत असलेल्या सावली बारवर छापा पडला होता.

       

रात्री पावणे अकराच्या सुमारास सुरु झालेली कारवाई पहाटे चारपर्यंत चालली.

पोलिसांनी बारवर छापा टाकून २२ बारबाला, २५ ग्राहक, वेटर, कॅशियर, मॅनेजरला अटक केली.

पोलिसांनी मॅनेजरचा जबाब नोंदवला. त्यात त्यानं बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं सांगितलं.

ज्योती कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. त्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत.

बारचा परवाना ज्योती यांच्या नावानं असल्याची कबुलीही रामदास कदम यांनी दिलेली आहे.

एफआयआर कॉपीमधील नमूद माहितीनुसार या कारवाईत 22 बारबाला, 25 ग्राहक, वेटर, कॅशियरला आणि मॅनेजरला छापेमारीमध्ये ताब्यात घेण्यात आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!