भीमा पाटस कारखान्यावर 500 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपावर राहुल कुल याचे उत्तर, म्हणाले…

पाटस : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून चौकशीची मागणी केली आहे.
हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे. ते या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल कुल म्हणाले, राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीनं राऊतांनी हे आरोप केले आहेत, असे कुल म्हणाले. राऊतांनी केलेले आरोप कुल यांनी फेटाळले आहेत.
कुल म्हणाले, गेल्या २२ वर्षांपासून मी भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तीकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले आहेत, असे कुल यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करत आज राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या, असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे.