भिगवण प्रकरणात राहुल कुल यांची एंट्री! म्हणाले, मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज, घटनेबाबत सगळंच सागितलं…


दौंड : भिगवण येथे दिवसाढवळ्या झालेल्या तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. विशेष म्हणजे आज मध्यरात्री मुलगी आणि मुलगा दोघेही पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्येही मुलीने आपण मर्जीने पळून गेलो असून अपहरण झालं नसल्याचं सांगितलं.

आता या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे. कारण या प्रकरणातील तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपींना राहुल कुल हे मदत करत असून आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या मोबाईलवर राहुल कुल हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्टेटस ठेवले आहे, असा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.

आता, याप्रकरणी आमदार कुल यांनी आपली बाजू मांडली. ज्यावेळेस गुन्हा घडला, त्यावेळी मी मुलीच्या नातेवाईकांच्या संपर्कात होतो. मुलीचा शोध घेईपर्यंत मी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होतो. माझ्यावर जे आरोप झाले, पण मलाही एक मुलगी आहे, माझ्या घरात महिला पदाधिकारी आहेत.

मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मग आरोप करावे, असे म्हणत आपल्यावर राजकीय हेतुने आरोप होत असल्याचे राहुल कुल यांनी सूचवले आहे. माझी नि:पक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील. त्यामुळे, याप्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे. गुन्हेगार कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही.

कुणी कुणाचं स्टेटस ठेवावे आणि आरोप करावे त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझे सगळे रेकॉर्डिंग काढावे, मी मला आलेले सगळे फोन घेतो. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया आमदार राहुल कुल यांनी दिलीय. मुलीच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे, मी भेटून त्यांना मदत करेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!