Rahul Kul : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर केली चर्चा…


Rahul Kul : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर चर्चा केली तसेच विविध मागण्यांची निवेदने दिली आहे. Rahul Kul

आमदार राहुल कुल यांनी केल्येल्या मागण्या पुढील प्रमाणे…

दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.

दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.

खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा.

कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत.

दौंड-पुणे मार्गादरम्यान मेमू ट्रिपची वारंवारता वाढवावी , ०१५२२/दौंड – हडपसर डेमू विशेष गाडी पुण्यापर्यंत चालवावी

11421/11422 – हडपसर – सोलापूर डेमू एक्सप्रेसला मांजरी, यवत, खुटबाव, कडेठाण आणि पाटस स्थानकांवर थांबा मंजूर करावा.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन येथे थांबा देण्यात यावा.
दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत.

२१६३ – एमजीआर चेन्नई सेंट्रल एसएफ एक्सप्रेस , 11013 – मुंबई LTT – कोईम्बतूर एक्सप्रेस, १२०२५ – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, 18520 – विशाखापट्टणम एक्सप्रेस, 11017 – कराईकल साप्ताहिक एक्सप्रेस, १७२२२ – काकीनाडा एक्सप्रेस, १११३९ – होसापेटे एसएफ एक्सप्रेस, 14806 – यशवंतपूर एसी एक्सप्रेस, 22920 – MGR चेन्नई सेंट्रल हमसफर एक्सप्रेस आदी सुपर फास्ट लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा.

वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी.

दरम्यान, यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार भाऊ गोरे उपस्थित होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आमदार राहुल दादा कुल यांनी केलेल्या सर्व मागण्यांबाबत दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!