Rahul Kul : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलासहीत सहा पदरी होणार! डाळींब बन येथील श्रीविठ्ठलच्या महापूजा प्रसंगी आमदार राहुल कुल यांची महत्त्वाची माहिती…

Rahul Kul उरुळीकांचन : पुणे – सोलापूर महामार्गावरील हवेली तालुक्याच्या हद्दीत होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हडपसर ते कासुर्डी असा इलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यासह महामार्ग सहापदरीकरण करुन वाहतुकीची समस्या सोडविण्याचा शासनचा प्रस्ताव असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
डाळींब बन (ता.दौंड) येथील श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजा दौंडचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड चे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते. यावेळी राहुल कुल हे बोलत होते. यावेळी दौंडचे तहसिलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अजय काळे, श्री विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन,हवेली बाजार समिती संचालक लक्ष्मण केसरकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुशांत दरेकर, मोहन म्हेत्रे, उरुळी कांचन सरपंचबाबा कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, यांच्यासह मान्यवर व भाविक उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले, दौंड व हवेलीच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासह वाहतुककोंडीसह विविध महत्त्वाचा कामांची शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे.शेतीला मुळशी धरणातून पाणी, जाणाई सिंचन योजनाद्वारे तालुक्याचा पाण्याचा भरून काढण्यात येणार आहे.पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी हडपसर ते कासुर्डी उड्डाणपूलासहीत महामार्ग सहापदरीकरण या गोष्टी डीपीआरमध्ये सामाविष्ठ करण्यात आल्या आहे. महत्त्वाचे मार्ग प्रशस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विठ्ठल बन देवस्थानच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात येत असून देवस्थानच्या जमीनीचा विषय मार्गी लावण्यात येईल असे राहूल कुल यांनी सांगितले. Rahul Kul
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, डाळींब बन विकासात समाधानकारक कामे झाली आहेत.पुढील काळात विकासकामांना प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न होतील. कार्यक्रमात महानंदा च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे , सरपंच बजरंग म्हस्के, दौंड पंचायतीचे माजी सदस्य किसन म्हस्के यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थान अध्यक्ष राजेंद्र कांचन , सूत्रसंचलन लक्ष्मण म्हस्के यांनी तर आभार तानाजी म्हस्के यांनी मानले.
पुणे-सोलापूर महामार्ग होणार कॉरीडॉर..!!
कार्यक्रमात आ. राहुल कुल यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हडपसर ते कासुर्डी या दरम्यान एकसलग उड्डाणपूल तसेच महामार्ग रुंदीकरण करण्याचे नियोजन प्रस्तावित असल्याचे सांगितले आहे. या निर्णयाने पुणे- सोलापूर महामार्गाचा कॉरीडॉर महामार्गात सामावेश झाल्याचे संकेत मिळत आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर रस्ते व वाहतुक मंत्रालय पुणे ते विजापूर असा कॉरीडॉर तयारीला लागल्याची चर्चा आहे.