Rahul Kul : दौंड तालुक्यातील महाआरोग्य शिबिरास भरघोस सहभाग, दौंडच्या जनतेच्या आरोग्याची जबाबदारी माझी – आमदार राहुल कुल


Rahul Kul : दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून मी गेल्या दहा वर्षात आरोग्य कामांसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे. ते तालुक्यातील बोरीपर्धी (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदीर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य शिबिरात बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की, स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असताना दौंड तालुक्याचा आमदार झाल्यापासून आरोग्याच्या बाबतीत काम करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षात आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करण्यात मला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने यश आलं आहे.

तसेच कोरोना कालावधीत देखील आम्ही मोठं काम उभे केले परंतु त्याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. यापुढील काळात देखील आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सर्व रुग्णांना अश्वस्त केले.

या शिबिरात सुमारे १३ हजार ८०० रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली असून, तपासणी ते संपूर्ण उपचार आशा प्रकारचे हे शिबिर आहे. पुण्यातील ५० हुन अधिक नामांकित हॉस्पिटलांनी या महाआरोग्य शिबिरात प्रतिसाद दिला. यामध्ये सुमारे ३००० हुन अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सुमारे ८०० दिव्यांगाना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक जाधव यांनी केले. Rahul Kul

यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल , माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भिमा पाटसचे कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे , धनाजी शेळके, तुकाराम ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख , प्रांताधिकारी मिनाज मुल्ला , तहसीलदार अरुण शेलार , उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले तर आभार उमेश देवकर यांनी मानले .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!