Rahul Kul : भीमा पाटस साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, आमदार राहुल कुल यांची माहिती…


Rahul Kul : भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय एम आर एन ग्रुप चे अध्यक्ष मुर्गेश निराणी व चेअरमन तथा आमदार ॲड. राहुल कुल यांनी एकत्रित येऊन घेतला आहे. अशी माहिती माहिती चेअरमन तथा आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली आहे. Rahul Kul

यावेळी बोलताना भिमा – पाटसचे चेअरमन तथा आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले की, यावर्षी कारखान्यास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता ३००० रूपये जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते. Rahul Kul

त्यानुसार ३००० रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार कुल यांनी पूर्ण केले आहे. सध्या भिमा – पाटसकारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आव्हान ही कुल यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!