Rahul Kul : दौंडमध्ये राहुल कुल फिरसे, केली तिसऱ्यांना हॅट्रिक, तालुक्यात मोठा जल्लोष…

Rahul Kul : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची तिसऱ्यांदा दौंडच्या जनतेने आमदारपदी निवड केली आहे. साधारण १४ हजार मतांनी राहुल कुल हे विजयी झाले आहेत. माजी आमदार रमेश थोरात हे सलग तिसऱ्यांदा आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झाले आहेत. Rahul Kul
राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी दौंड तालुक्यात चार चार खासदारांनी ताकद लावली मात्र जनतेने राहुल कुल यांचे कार्य लक्षात घेत त्यांना तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून दिले असल्याचे दिसत आहे. तसेच तालुक्यात मोठा जल्लोष सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दौंड विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. माजी आमदार रमेश थोरात यांना शरद पवारांचे तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळत होती.
त्यामुळे आज दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच प्रत्येकजण निवडणूक निकालाची आतुरतेने वाट पाहत होता. यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल की माजी आमदार रमेश थोरात हे विजयी होणार यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला होता.
