Rahul Kul : आमदार राहुल कुल यांच्या उमेदवारी अर्जाला मोठे शक्तिप्रदर्शन! राहू बेट जनतेला आण्णांच्या निवडणुकीची आठवण…

Rahul Kul दौंड : दौंड विधानसभा निवडणूकीसाठी महायुती मधून भाजप तर्फ आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केला आहे यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी अभूतपूर्व गर्दी दिसून आली आणि राहू बेटातील कुल समर्थकांना १९९५ च्या निवडणुकीची आठवण आली.
१९९५ साली स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील अशीच अभूतपूर्व गर्दी जमली होती. दरम्यान महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप तर्फे आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांच्याकडे दौंड तहसील कार्यालयात भरला आहे.
यावेळी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे दौड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया नंदू पवार इ. मान्यवर उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर दौंड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा घेण्यात आली. Rahul Kul
यावेळी भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी राहुल कुल यांना विधानसभेत पाठवा त्यांना भाजप मंत्री करणार आहे असे सांगितले आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी राहुल कुल हा एक अभ्यासू आमदार असून भविष्यातील मंत्री असल्याचे सांगितले आहे.
महायुतीचे उमेदवार असणारे राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत पुढील पाच वर्षात दौंड चा चेहरामोहरा बदलण्यासाठी मला साथ ध्या, असे सांगत आजच्या सभेला आणि उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू भागवत यांनी केले आहे.