राहुल कुल यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी ! वैशाली नागवडेंच्या वक्तव्याने दौंडमध्ये महायुतीत ताणतणाव …!!
पुणे :दौंड विधानसभेसाठी भाजप तर्फे निवडणूक लढवत असलेले उमेदवार आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी आणि महायुतीचा धर्म पाळावा अशी मागणी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी केली आहे
त्यापुढे बोलताना म्हणाल्या की दौंड विधानसभा ही पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असून राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आम्ही वरिष्ठांकडे आणि महायुतीतील घटक पक्षांकडे या जागेची मागणी केली होती 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी थोडक्या मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला असून दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अजित पवार यांना मानणारा गट असून त्या सर्वांच्या निर्णयानुसारच आम्ही वीरधवल जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे महायुतीचा धर्म पाळत भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनीच या निवडणुकीतून माघार घेणे गरजेचे आहे
दौंड तालुक्याच्या विकासात अजित पवार यांचे मोठे योगदान असून त्या योगदानाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागितली होती पक्षाने आम्हाला अधिकृतपणे ए बी फॉर्म दिला असून वरिष्ठ पातळीवर वीरधवल जगदाळे हे एक सक्षम नेते असल्याचे लक्षात आल्यानंतरच त्यांना आम्ही उमेदवारी मागितली होती
याउलट भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी या ठिकाणी जागा मागणे चुकीचे ठरणार आहे त्यामुळे राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीमध्ये सलोखा कायम ठेवावा अशी मागणी केली आहे