Rahul Gethe : डान्सबार विरोधातील बेधडक कारवाईमुळे राहुल गेठेंना मिळालं मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा मोठा निर्णय…


Rahul Gethe मुंबई : आपल्या बेधडक कारवाईमुळे नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठे नेहेमी चर्चेत होते. त्यांच्या कामगिरीमुळे आता सरकारकडून मोठे प्रमोशन मिळाले आहे. बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करत, त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. त्यांना आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यांनी महापालिकेच्या हद्दीत चालणाऱ्या बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करून अनेकांना हिसका दाखवला होता. बेकायदेशीर डान्सबारच्या इमारती पाडून त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती.

यामुळे एकनाथ शिंदे सरकारने त्यांना अतिरिक्त आयुक्तपदावर बढती दिली आहे. यापूर्वी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणूनही कार्यरत होते, त्यांच्या कामामुळे अनेकांना घाम फुटत होता. अनेक गैर कामे त्यांनी बंद केली होती. ज्यामुळे सरकारमधील त्यांचा दराराही वाढला.

त्यांच्या धोरणामुळे बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बेकायदेशीर डान्सबार आणि इतर अतिक्रमण करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा आहे. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने या कामात चांगले यश मिळणार आहे. Rahul Gethe

आता बेकायदेशीर अतिक्रमण आणि व्यवसायांविरोधातील कारवाईला आणखी वेग मिळणार आहे.
पुण्यात अमली पदार्थ, डान्सबार आणि रात्री-अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पवित्रा घेत, शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. याचा फायदा होताना दिसत आहे.

नंतर डॉ. गेठेंनी नवी मुंबई महापालिकेतील बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून, डॉ. गेठेंच्या वर्किंग स्टाइलवर बोट ठेवले होते. मात्र त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. डॉ. गेठेंच्या या प्रमोशनमुळे आता पुन्हा बारमालकांना चाप बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group