राहुल गांधी यांचा ट्रकमधून दिल्ली ते चंदीगड प्रवास, व्हिडिओ व्हायरल…


नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर राहुल गांधी थोडे रिलॅक्स झाले असून नुकताच त्यांनी ट्रकमध्ये बसून प्रवास केला.

राहूल गांधी यांनी दिल्लीहून शिमलाकडे रवाना होताना अंबाला ते चंदीगड दरम्यान ट्रकने प्रवास केला. याचा व्हिडीओ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि ट्रक चालकांनीही शेअर केला आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे.

हा व्हिडीओ सोमवारी रात्रीचा असून यादरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक चालकांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या देशातील सर्वसामान्य लोकांचे म्हणणे ऐकूण घ्यायचे आहे.

यामुळे त्यांनाही आपल्यासोबत कोणीतरी उभा आहे असा विश्वास मिळतोय. भविष्यासाठी कोणीतरी आपले सर्वस्व द्यायला तयार असल्याची जाणीव होतेय. द्वेषाच्या बाजारात कोणीतरी प्रेमाचे दुकान उघडतंय, असे त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!