कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा मणिपूरमधून शुभारंभ, इतक्या मतदारसंघातून होणार पायी प्रवास..!!

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ आज रविवार (ता.१४) मणिपूरमधून होत आहे. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधूनच सुरू होणार असून इंफाळमधूनच या यात्रेची सुरुवात होईल.
या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि सामाजिक न्याय हे मुद्द लावून धरण्यात येतील. राहुल गांधी यांच्या या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेचा चौदा राज्यांतून प्रवास होईल तसेच शंभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतील.
१४ राज्ये, ८५ जिल्हे अन ६,२०० किमीचा प्रवास..
राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रेत १४ राज्यामधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्च्या मणिपूर,नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात ६,२०० किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारी रोजी रोजी मणिपूर मधून या यात्रेचा शुभारंभ करतील, अशी मर्हाटी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हि यात्रा तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी सवांद साधणारी असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.