Rahul Gandhi : राहुल गांधी पंढरीच्या वारीत होणार सहभागी, निमंत्रण स्वीकारत तारीखही दिली, जाणून घ्या…


Rahul Gandhi : आषाढ महिना आला की तमाम महाराष्ट्रातील जनतेला वारीचे वेध लागते. आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठूरायांचे दर्शन ‘याची देही, याची डोळा’ घेतल्यानंतर वारकरी तृप्त होतात. यंदा १७ जुलै रोजी आषाढी आहे.

त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या वारीला आता राजकारणाची चाहूल लागली आहे. त्यानंतर आता राहुल गांधींच्या वारीत सहभागी होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, येत्या १४ जुलै रोजी राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

आमदार संजय जगताप म्हणाले की, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत. तसेच सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील. Rahul Gandhi

वारीच्या माध्यमातून विधानसभेसाठी तयारी..

आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आता महाविकास आघाडीने राहुल गांधींना वारीत सहभागी होण्यासाठी म्हणून आमंत्रित केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो अशी भावना मविआच्या नेत्यांमध्ये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!