Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी आता कुस्तीच्या मैदानात, हरियाणात बजरंग पुनिया सोबत केले दोन हात…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सतत चर्चेत असतात. आता राहुल गांधी आज हरियाणाच्या आखाड्यात पोहोचले. तिथल्या कुस्तीपटूना ते भेटले. यावेळी त्यांनी बजरंग पुनियासोबत कुस्ती खेळली. याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

राहुल गांधी यांनी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका कुस्ती अकादमीला भेट दिली आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत कुस्ती अकादमीला भेट दिली. राहुल गांधी सकाळी छत्र गावातील ‘वीरेंद्र आखाडा’ येथे पोहोचले. Rahul Gandhi
नंतर त्यांनी पुनिया आणि कुस्तीच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली. राहुल गांधींनी कुस्तीचे किस्से कथन करण्यात बराच वेळ घालवला. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची कुस्तीपटूंसोबत बैठक झाली.

राहुल गांधी सकाळी आखाड्यात पोहोचले. त्यांनी आम्हाला आमची दिनचर्या, आम्ही कसा व्यायाम करतो याबद्दल विचारले आणि त्यांनी आमच्यासोबत व्यायामही केला, असे कुस्तीपटू म्हणाले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या कुस्ती महासंघाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अनेकांनी कुस्तीमधून माघार घेतली आहे. यामुळे हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.