Rahul Gandhi : आरक्षणाची मर्यादा वाढवणार!! मराठा, धनगर समाजाला हिस्सा देणार, पुण्यातील सभेत राहुल गांधी यांची मोठी घोषणा…


Rahul Gandhi : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात प्रचंड सभा झाली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते कधी संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी आरक्षण संपवून टाकणार, असे सांगतात.

असे असताना मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यानंतर देशात आरक्षणाची असलेली 50 टक्क्यांची मर्यादा वाढवू, असे मोठे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. ते म्हणाले, यामध्ये मराठा, धनगर समाजांनादेखील त्यांच्या आरक्षणाचा हिस्सा देऊ. तसेच जातनिहाय जनगणना करून त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी मिळेल.

तसेच ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवू, असे कुठेही जाहीर करून दाखवावे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान, लोकशाहीला वाचवण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानाला संपवू इच्छित आहेत. हे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. Rahul Gandhi

तसेच यामध्ये या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी हिंदुस्थानच्या जनतेला सोबत घेऊन वर्षानुवर्षे लढाई करून देशवासीयांना संविधान दिले. याच संविधानामुळे देशातील गरीब, होतकरू, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात, आणि भाजपकडून मात्र याला विरोध असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

या संविधानाशिवाय काहीच नाही. जे काही जनतेच्या हातात आहे, ते सर्व देशाच्या फक्त 20 ते 25 लोकांच्या हाती जाईल असे राहुल गाधी म्हणाले, यावेळी मोठ्या प्रमाणावर सर्व पदाधिकारी तसेच काँग्रेस नेते देखील उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!