Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपती नियुक्ती, इंडिया आघाडीचा महत्त्वाचा निर्णय..


Rahul Gandhi : लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. . इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर राहुल गांधी हेच विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत घोषणा केली आहे.

राहुल गांधी हे लोकसभेत विरोधकांची बाजू कणखरपणे मांडणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून पुरेशा जागा न मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेता लोकसभेत नव्हता. पण आता इंडिया आघाडीला देखील चांगल्या जागांवर यश मिळाल्यामुळे आता विरोधकांच्या बाजूने विरोधी पक्षनेता असणार आहे. Rahul Gandhi

दरम्यान, काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४४ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ च्या लोकसभेत ५२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतापदापासून लांब राहावं लागलं. पण यावेळी काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळालं आहे.

तसेच सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या १०० जागा आहेत. त्यामुळे यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे.

इंडिया आघाडीकडून या निवडणुकीत कुणाला विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिली जाईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता पदासाठी निवड झाल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!