Rahul Gandhi : …त्यावेळी अशोक चव्हाण माझ्या आईसमोर ढसाढसा रडले, राहुल गांधी यांचा मोठा गौप्यस्फोट
Rahul Gandhi : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते.
त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, मला तुरुंगात जायचं नाही, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. या यात्रेनंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे इंडिया आघाडी नेत्यांची विराट सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
यावेळी इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित होते, भाजपवर आरोप करतांना राहुल गांधी म्हणाले, अनेकांना ईडीचा धाक दाखवला जात आहे. त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. Rahul Gandhi
नुकत्याच एका नेत्याने माझ्या आईला फोन केला होता. फोन वर रडत रडत तो नेता म्हणाला, सोनियाजी मला माफ करा. या शक्तिविरोधात लढण्याची माझी ताकद नाही. मला जेल मध्ये जायचे नाही. अशाप्रकारे आज हजारो लोकांना घाबरवले जात आहे. असे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय एजन्सी आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स) चा विरोधकांच्या विरोधात कथित वापर केल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, सत्ताधारी पक्ष ईव्हीएम, सीबीआय, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) शिवाय लोकसभा निवडणुका घेणार नाहीत. जिंकण्यास सक्षम. यामागे एक शक्ती असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.