राहुल गांधींनी बॉम्ब फोडला ; कर्नाटकात 6018 नाव वगळली तर महाराष्ट्रात 6850 जोडली, मतदारांचा थांगपत्ता नाही….


पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मतचोरी प्रकरणावरून घेरल आहे. त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा बॉम्ब टाकत निवडणूक आयोग पद्धतशीरपणे लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे मतदार यादीतून हटवत आहे. हा प्रकार व्होट चोरी नसून व्होट डिलीट करण्याचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मत चोरीचा आरोप करताना राहुल गांधी यांनी कर्नाटकातील अलंद या मतदार संघाचे उदाहरण दिलं. या मतदारसंघात कोणीतरी 6018 मतदारांची नाव वगळली. 2023 मधील निवडणुकीत अलंद या मतदारसंघातून किती मतदार हटवण्यात आले हे आम्हाला माहिती नाही. ही संख्या 6018 पेक्षा अधिक आहे. पण ही नाव हटवताना योगायोगाने काही जण पकडल्या गेले. तिथल्या बुथ लेव्हल अधिकाऱ्याला त्याच्या काकाचे नाव हटविल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याने त्याचा तपास घेतला. त्याने त्याच्या शेजाऱ्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आपण असा कोणताही अर्ज केला नसल्याचे सांगितले. म्हणजे ज्याने मतदाराचे नाव वगळण्याची मागणी केली आणि ज्याचे मतदार यादीतून नाव गायब झाले त्या दोघांनाही हा प्रकार माहिती नव्हता. कोणत्या तरी बाहेरील शक्तीने ही प्रक्रिया हायजॅक केली आणि मतदारांची नाव यादीतून वगळली.

तर विदर्भातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6850 मतदारांची नाव जोडण्यात आली. त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याचे ते म्हणाले. कोणती तरी यंत्रणा, अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून हा प्रकार करण्यात आल्याचा. त्यासाठी कॉल सेंटरचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या देखरेखीखालीच हे गैरव्यवहार सुरू आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!