Rahul Gandhi : राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाचं समन्स, २ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्याच्या न्यायालयाने समन्स बजावले आहे. 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राहुल गांधींना देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. पुणे प्रथमवर्ग न्यायालयाने आदेश जारी करत राहुल गांधी यांनी २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी यांनी २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, असा आदेश पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणात पुण्यातील न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आता कोर्टाने राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. Rahul Gandhi
दरम्यान, पुण्यातील विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.पण राहुल गांधी संसदेचे विरोधी पक्षनेते असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असा अर्ज ॲड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्यावतीने न्यायालयात दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या वकिलाने केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला.