Rahul Gandhi : देशद्रोहीला RSS समजणार नाही!! गिरीराज सिंह राहुल गांधी यांच्यावर संतापले…


Rahul Gandhi : अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रविवारी अप्रवासी भारतीयांच्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधींनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर बोट ठेवत संघाला आणि भाजपाला लक्ष्य केले होते.

देशद्रोही हे आरएसएसला समजू शकणार नाहीत , असे प्रत्युत्तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर दिले आहे.

अमेरिकेतील टेक्सास येथील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘आरएसएस’बद्दल टिप्पणी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही भारत हा अनेक विचारांचा देश असल्याचे मानते. असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान कोट्यवधी भारतीयांना पीएम मोदी भारतीय संविधानाला धक्का लावत असल्याची जाणीव झाली. त्यावेळी भाजप आणि आरएसएस विरुद्धची लढाई स्पष्ट झाली, असा दावा राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपने जोरदार उत्तर दिले आहे. Rahul Gandhi

राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, आरएसएसची भूमिका काय आहे? हे त्यांनी त्यांच्या आजींना विचारण्याचे काही तंत्रज्ञान असेल तर त्यांनी तसे करावे अथवा त्यांनी इतिहासाची पाने चाळावीत.

आरएसएसला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी राहुल गांधींनी अनेक जन्म घ्यावे लागतील. गद्दार हे आरएसएसला समजू शकत नाहीत आणि जे देशावर टीका करण्यासाठी परदेशात जातात; ते त्याचे मर्म समजू शकत नाहीत.

गिरिराज सिंह पुढे म्हणाले, राहुल गांधी केवळ आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी परदेशात जातात असे दिसते. ते या जन्मात तरी RSS ला समजून घेऊ शकणार नाहीत. कारण ती भारताच्या मूल्यांमध्ये आणि संस्कृतीत रुजली आहे. असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!