Rahul Gandhi : राहुल गांधींचे मोदी सरकारला थेट चॅलेंज, ‘ते’ दोन कायदे लागू करणारच, तुम्हाला काय करायचंय करा…


Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी ५० टक्के आरक्षण मर्यादा आणि जातीय जणगणना आम्ही लागू करून दाखवू, तुम्हाला जे करायचंय ते करून दाखवा, असा इशारा दिला आहे. संविधानाला ७५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चासत्र सुरु आहे.

या चर्चासत्रात आज राहुल गांधी बोलत होते. या चर्चेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला थेट चँलेज दिले आहे. संविधानावर बोलताना राहुल गांधी संसदेत म्हणाले की, भारतीय संविधान आपल्या देशाच्या एकतेचे आणि विचारधारेचे प्रतिनिधित्व करते. आणि हे संविधान महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारांनी प्रेरीत आहे. Rahul Gandhi

संविधान हे आपल्या देशाच्या विचारांचा एक सेट आहे. जो महादेव, गुरुनानक आणि बसवन्ना यांच्याकडून आला आहे.तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अभय, निडरता, अहिंसा आणि सत्याबद्दलची गोष्ट सांगितली.

राहुल गांधी यांनी पुढे संविधानाचे पुस्तक हातात धरून सावरकरांना कोट करत म्हणाले की, तुमच्या नेत्याने (सावरकर) सांगितले होते की, भारतीय राज्यघटनेत भारतीय काहीही नाही. ते म्हणाले, “तुम्ही त्यांची (सावरकरांची) स्तुती करता, कारण तुम्हाला तसे करावे लागेल.

यानंतर राहुल गांधी यांनी मनुस्मृती आणि राज्यघटना ही दोन्ही पुस्तके दाखवली आणि म्हणाले, भारताचे संविधान भारतीय नाही, ज्या पुस्तकाने भारत चालत आहे ते पुस्तक या पुस्तकाने बदलले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!