पुण्यात पुन्हा राडा! कोयता गँगने भररस्त्यात फिरवल्या तलवारी, वाहनांचीही तोडफोड…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगनं राडा घातला आहे. कोंढवा परिसरात एका टोळक्याने धारदार कोयत्याने वाहनांची तोडफोड केली आहे. या तोडफोडीत वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

ही घटना घडण्याआधीच, पुण्यातील उत्तमनगर परिसरात एका गुंडाने कोयता घेऊन दहशत माजवली होती. फ्लॅट बुकींग रद्द केल्यानंतर झालेल्या वादातून आरोपी ऋषिकेश गायकवाड याने फिर्यादी कुटुंबाला धमकावले होते. या प्रकरणाचाही सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता.

ताज्या घटनेमुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कोंढवा सारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात भररस्त्यावर नंग्या तलवारी फिरवल्या जात आहेत, हे चिंतेचं कारण ठरत आहे.

दरम्यान, कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात कोयताधारी टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. टोळक्याने हातात कोयते आणि हत्यारे घेऊन परिसरातील वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेत नऊ दुचाकी, दोन रिक्षा आणि एका चारचाकी वाहनाचं नुकसान झालं आहे. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!