लग्न मंडपात तुफान राडा! कारण ठरलं चपाती, भर लग्नात नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेश : आपल्या नातेवाईकांना जेवणामध्ये चपाती उशिराने दिल्यामुळे नाराज झालेल्या नवरदेवाने लग्नच मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरुण ऐवढ्यावर न थांबत त्याने त्याच रात्री दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील केले.

उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. याची माहिती जेव्हा नवरीच्या कुटुंबीयांना कळाली तर त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेची सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होत आहे.
तसेच याप्रकरणी नवरीने पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. रडत रडत नवरीने पोलिसांकडे न्याय मिळावा अशी मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, हे प्रकरण मुगलसराय पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील हमीदपूरमध्ये घडले आहे. याप्रकरणी बोलताना पीडित नवरीने सांगितले की, तिचे लग्न सात महिन्यापूर्वी त्याच गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत ठरले होते. २२ डिसेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते. माझ्या कुटुंबीयांनी लग्नाची संपूर्ण तयारी केली होती.
या घटनेनंतर नवरीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत न्याय मिळावा अशी मागणी केली. नवरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, लग्नाच्या वरातीमध्ये मुलाकडून २०० लोकं आली होती. त्यांच्या जेवणासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान हुंडा म्हणून दीड लाख रुपये दिले होते. या लग्नासाठी आमच्या कुटुंबीयांचे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. तक्रार आल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढण्यात आली आहे.