Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर जोरदार निशाणा, म्हणाले, राज्याचे वाटोळे न करता त्यांनी…


Radhakrishna Vikhe Patil :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

या निवडणुकीच्या निकालांच्या निमित्ताने जर आपण शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर त्यांचा करिष्मा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. का

याच स्थितीवर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला व त्यांनी म्हटले की, जाणता राजा असणाऱ्या शरद पवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये जनाधार गमावला आहे व त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी असावे.

गुरुवारी लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती व त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. Radhakrishna Vikhe Patil

यावेळी बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होतेव सत्तेत असलेल्या महायुतीची मात्र लोकसभेत पीछेहाट झाली होती. परंतु त्यावेळी ईव्हीएम वर कोणीही शंका उपस्थित केली नाही.

ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती व निवडणूक नाकारण्याची देखील गरज होती. जनमत बाजूला असले की ईव्हीएम चांगली, जनमत विरोधात गेले की ईव्हीएम वाईट अशी विरोधाकांची सध्या गत झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.

तसेच मंत्रिपदांबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये जे काही आता संभाव्य मंत्रीपदे अस्तित्वात येतील त्याचा संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची गरज नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास असून त्यानुसार ते मला चांगली जबाबदारी देतील याविषयी माझ्या मनात शंका नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

तसेच विखे पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दावे देखील फेटाळून लावले. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की,एकनाथ शिंदे नाराज असल्याचे रान प्रामुख्याने माध्यमांनी उठवले आहे. परंतु ते नाराज असण्याची कुठल्याही प्रकारचे कारण नाही. भाजप जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी स्वतः सांगितले असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!