फुकट जेवण न दिल्याने हॉटेलमध्ये राडा, चालक व कामगारांना मारहाण; तिघांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा..

पुणे : फुकट जेवण न दिल्याने तिघांनी मिळून हॉटेलमध्ये तोडफोड करीत चालक आणि कामगारांना मारहाण केल्याची घटना उघडकी आली आहे. ही घटना सोमवारी (ता.२१) अंगणवाडी चौकाजवळ मोरेवस्ती, चिखली येथे घडली आहे. याप्रकणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन बाळू भोसले (वय.23, रा.चिखली), सोन्या ऊर्फ अशोक शंकर राठोड (वय. 19, रा. चिखली), हिंग्या आबासाहेब कोळेकर (वय. 23, रा. महाळुंगे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर इरप्पा हेळवे (वय. 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी मोहन भोसले आणि फिर्यादी यांची तोंडओळख आहे. दरम्यान, मोहन आणि हिंग्या हा फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आला. त्या वेळी फिर्यादी हॉटेलमध्ये नव्हते.
त्याने फिर्यादीस फोन करून, मफमी तुझ्या हॉटेलवर आलो आहे. जेवण दे नाहीतर तुझे हॉटेल फोडतो, कामगारांना मारतो, तुझे हॉटेल बंद करफफ अशी धमकी दिली. हॉटेलच्या किचनमधून साहित्य घेऊन कामगारांना मारण्याची धमकी देत हॉटेलमधील ग्लास, ताटे, टेबल, खुर्च्या फोडून नुकसान केले.
दरम्यान, काही वेळाने फिर्यादी यांचा भाऊ हॉटेलमध्ये असताना आरोपी मोहन आणि सोन्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी लॉलीपॉप मागितला. त्यांना लॉलीपॉप दिला नाही, म्हणून त्यांनी फिर्यादी यांच्या भावाला शिवीगाळ करून हॉटेलमध्ये तोडफोड केली. फिर्यादी यांच्या भावाला दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.