पुण्यात राडा!! वाढदिवस कसला करताय? बर्थडे सेलिब्रेशनमध्येच गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू, उडाली खळबळ…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

त्यातच देहू रोड इथल्या आंबेडकरनगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्रीचे साधारण अकरा ते साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .

विक्रम गुरुस्वामी रेड्डी (वय. ३७) असे मृत्युमुखी पडल्याचे नाव असून नंदकिशोर यादव (वय. ४०) यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव शाबीर समीर शेख असल्याची माहिती जखमी यादव यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात एक सराईत गुन्हेगार आला आणि त्याने “वाढदिवस करताय?” म्हणत आपल्याकडील पिस्तूल काढत गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या गोळीबारात विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा जागेवर मृत्यू झाला असून नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातवरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विक्रम रेड्डी हे तेलगू कन्नडा संगम देहू रोड उपाध्यक्ष रमेश रेड्डी यांचे धाकटे बंधू असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!