राजकारणातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह; नरहरी झिरवाळ प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला…

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याचे काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. यादरम्यानच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत आले आहे.

एका बाजूला मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण तर दुसऱ्या बाजूला नाशिकमधील अशोक खरात याचा भोंदूगिरीचा प्रकार या दोन घटनांनी राज्यातील सत्ताकारण आणि समाजव्यवस्थेचा खराखुरा चेहरा उघडा पाडला आहे. झिरवाळ प्रकरणाने तर सत्तेच्या नैतिकतेची पार धज्ज्या उडवल्या आहेत.
मंत्री नरहरी झिरवळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शासकीय निवासस्थानाचा वापर अशा अनैतिक कृत्यांसाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप आता होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन यादव नावाच्या ट्रान्सवुमनसोबत नरहरी झिरवळ यांचे हे आक्षेपार्ह चित्रण समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द पवन यादवचा भाऊ रवी यादव यानंच हे संपूर्ण प्रकरण समोर आणलं आहे. रवी यादवच्या आरोपानुसार, पवन हा ट्रान्सवुमन असून तो खंडणी गोळा करण्याचं काम करतो. इतकंच नव्हे तर, दमदाटी आणि खंडणी प्रकरणी पवन यादववर यापूर्वीच मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
व्हिडीओमध्ये नरहरी झिरवाळ हे स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. यासोबतच व्हिडीओमध्ये दारूच्या काही बॉटल्स देखील बघायला मिळत आहेत.
कथित व्हायरल व्हिडिओनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सकपाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा प्रकार केवळ एक व्हिडिओपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे गंभीर उदाहरण आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे म्हटले की, करदात्यांच्या पैशांची जबाबदारी असलेल्या एका जबाबदार मंत्र्याकडून अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे हे केवळ वैयक्तिक मर्यादांचे उल्लंघन नसून, सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच धक्का देणारे आहे.
जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी किमान नैतिकतेचे भान ठेवणे अपेक्षित असते. मात्र, या कथित व्हिडिओमुळे त्या अपेक्षांचा भंग झाल्याचे दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.