Pushpa 2 : सहा मिनिटांच्या सिनसाठी गेले ६० कोटी, पुष्पा 2 च्या टीजरमध्ये नेमकं आहे तरी काय?


Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’चा चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यातया आला. सर्वचजण या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते.

येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘पुष्पा २ द रूल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ६८ सेकंदाच्या टीजरमध्ये एकच सीक्वेंस दिसत होते. आणि अल्लू अर्जुनचा एकच गेटअप दिसला. पण, त्याचा हा एक गेटअप इतका पॉवरफुल होता की, लोक सातत्य़ाने ‘पुष्पा २’ चा टीजर पाहू लागले.

टीजरमध्ये अल्लू अर्जुनचा हा गेटअप एका धार्मिक उत्सवाशी जोडला गेला आहे, त्यास ‘तिरुपति गंगम्मा जतारा’ म्हटलं जातं. या उत्सवामागे महिलांच्या सन्मानाशी संबंधित एक खूप जुनी कहाणी आहे, जी एक शक्तिशाली देवीशी संबंधित आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, एका सीक्वेंससाठी निर्मात्यांनी खूप मोठी रक्कम खर्च केली आहे. Pushpa 2

दरम्यान, ५०० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली आहे. देशातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश आहे. चित्रपट पुष्पा : द राइज याचा सीक्वेल असून टीझरवरून चित्रपट कोटींचा गल्ला जमवणार, हे जवळपास निश्चित आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!