Purandar : पुरंदरच्या तहसीलदारांना निवडणूक कामकाजातून हटवले, विभागीय आयुक्तांची कारवाई, नेमकं काय घडलं?
Purandar पुणे : भारत निवडणूक आयोग यांनी मुख्य निवडणूक अधिकारी पुरंदर, विधानसभा मतदारसंघाकरिता अधिसूचित असलेल्या तहसीलदार पदावर कार्यरत असलेले विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवण्याचे व त्यांच्या जागी पुणे महानगरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरंदरच्या विधानसभा मतदारसंघाकरिता अधिसूचित असलेल्या तहसीलदार पदावर कार्यरत असलेले विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. Purandar
या दिलेल्या आदेशानुसार, हे सेवावर्ग आदेश आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पारीत करण्यात आले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सेवा त्यांच्या मूळ पदावर पूर्ववत करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांच्या स्तरावरुन उचित निर्णय घ्यावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या कार्यकाळामध्ये तहसील कार्यालयामधून डेमो ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. त्यामुळे तहसीलदार यांना निवडणुकीच्या कामकाजातून हटवण्यात आल्याची चर्चा सध्या पुरंदर तालुक्यामधून सुरू आहे. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते.