Purandar International Airport : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भविष्य अंधारात! राज्य सरकारचा अवधी उरला अवघा दिड वर्ष, भूसंपादनाचा निर्णय नाहीच….

जयदिप जाधव
Purandar International Airport उरुळीकांचन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेकाळी ड्रीमप्रोजेक्ट असलेला पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रोजेक्ट महायुती सरकारचा कार्यकाळ दिड महिन्यापुरताउरलाअसला तरी अद्याप शासन इच्छाशक्तीच्या प्रतिक्षेत आहे. पुरंदर विमानतळाला केंद्र सरकारच्या हवाई ,संरक्षण तसेच भारतीय विमान प्राधिकरण यांच्या मंजुऱ्या मिळाल्या असल्या तरी राज्य सरकारने अद्याप या विमानतळाच्या भूसंपादन कार्यवाहीसाठी हालचाली तसेच शासन समितीची नेमणूक नसल्याने या महायुतीच्या कार्यकाळात विमान तळ निर्मितीच्या प्रयत्नांना आशा संपुष्टात असल्याची चिन्हे दिसत आहे.
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्याचा मानस २०१४ पासून युती सरकारच्या कार्यकाळापासून सुरू आहे. या विमानतळातून औद्योगिक, कृषी व प्रवासी वाहतूकीला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पुरंदर तालुक्यातील २, ८३२ हेक्टर क्षेत्रावर या विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रस्तावित आहे. या विमानतळासाठी यापूर्वी जिल्हा प्रशासनाने २०१९ साली भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र राज्यातील युती सरकार बदल्यानंतर आघाडी सरकारकडून बारामती व पुरंदर या तालुक्यातील नवीन जागा निश्चित करुन केंद्र सरकारकडे नव्याने परवाणग्या माघविण्यात आल्या.मात्र केंद्र सरकारच्या हवाई दलाने परवानगी नाकारल्या नंतर राज्यात महायुती सरकार जुन्या जागीच विमानतळ उभारण्याचा निर्णय प्रस्तावित ठेवला आहे.
मात्र महायुती सरकारला दिड महिन्यांचा कालावधी उरला आहे.परंतु राज्य सरकारकडून कोणतीच सकारात्मक भूमिका होत नसल्याने विमानतळ उभे करण्याचा निर्णय टांगणीला आहे. दिड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना राज्य सरकार विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना व भूसंपादन करण्यासाठी समिती नेमली नसल्याने विमानतळ या सरकारच्या कार्यकाळात होत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. Purandar International Airport
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. भविष्यात अनेक प्रकल्प या भागात येऊ शकणार आहे. रोजगार निर्मितीसह मोठ्या संधी गुंतवणूकीतुन मिळणार आहे. या प्रस्तावित विमानतळामुळे पुरंदर , हवेली व दौंड तालुक्यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहेपुरंदर तालुक्याच्या विमानतळाच्या घोषणेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली हे. त्यामुळे भविष्यात या विमानतळाचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे.
पुण्याला मंत्रीपद मिळून अपेक्षित परिणाम नाही?
पुणे जिल्ह्याला केंद्रीय नागरी वाहतुक मंत्रालयाचे राज्यमंत्री पद मुरलीधर मोहोळ यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विमानतळ उभे करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे सुतोवात केले होते. मात्र महिना उलटून निर्णय नाही, तसेच राज्य सरकारचा अवधी दिड महिन्यांवर आल्याने निर्णय होईल अपेक्षा कमीच उरली आहे.