Purandar Airport : पुरंदर विमानतळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या, नेमकं घडलं काय? चर्चांना उधाण….


Purandar Airport : गेल्या अनेक दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेकदा फक्त चर्चा सुरू आहेत. यामुळे प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कंपनीत पुणे येथील कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामुळे याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात बदली झाल्याने प्रस्तावित विमानतळाबाबत धाकधूक वाढली आहे. Purandar Airport

पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले होते. परंतु आता कार्यालयातील सर्वच कर्मचार्याच्या बदल्या मुंबई येथील कार्यालयात अचानक करण्यात आल्याने विमानतळ कामकाजाचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

विमानतळाबाबत शंका कुशंका घेण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादीतचे अप्पर जिल्हाधिकारी तेजुसिग पवार यांनी या बदल्याचे आदेश काढले आहेत.

यामध्ये वरिष्ठ लिपिक, सल्लागार भुसंपादन व पुनर्वसन, लघुलेखक मराठी व इंग्रजी, लिपिक टंकलेखक या सर्व कर्मचार्यांच्या बदलीचे कार्यालयीन आदेश ९ मे रोजी देण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे येथील कुबेरा चेंबरमध्ये हे कार्यालय कार्यरत होते. पुरंदर विमानतळाचे कामकाज हे सर्व कर्मचारी पाहत होते. शासन निर्णय मे २०१८ अन्वये नियोजित पुणे पुरंदर विमानतळ उभारणीसाठी पुरंदर तालुक्यातील सात गावामधील 2367 हेक्टर जागेच्या भूसंपादनास अंदाजे 3513 कोटी रुपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

तसेच अधिसूचनेद्‌वारे 1832 हेक्टर जमीनीसाठी महाराष्ट्र विकास विमानतळ कंपनीस नियोजन प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. तत्कालिन उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठकीत प्रस्तावित जागेवर तीव्र विरोध पाहाता पर्यायी नवीन जागेमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय रिसेपिसे व पांडेश्वर या गावाजवळ विमानतळ उभारणी शक्य असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!