मोठी बातमी! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल..


पुणे : पुणे पोलिसांच्या दप्तरी अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. सोलापुरातील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे.

शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय.२३) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसाच्या त्याच्या मागावर होते. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मोक्यातील हा फरार आरोपी ठार झाला. या घटनेने पुण्यातील गुंडांमध्ये दहशत पसरली आहेत. पुण्यातील स्वयंघोषीत दादा, भाऊ सध्या अंडरग्राऊंड झाल्याचे समजते.

शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. पोलीस त्याच्या शोधात होते. तो सोलापूर जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते.

लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला.गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शाहरूख हा मोका गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण तो सारखा गुंगारा देत होता. जीवाच्या भीतीने त्याने सोलापूर गाठले होते. पण त्याच्या कारवाया थांबत नव्हत्या. त्याचा काही गुन्ह्यात हात असल्याचे समोर आले होते. तो मोहोळ जवळील लांबोटी येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक सोलापूरात दाखल झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!