पुण्यातील रीलस्टार वादात! “गुलाबो गँग”च्या आंदोलनावेळी महिला पत्रकारांशी केलेलं वर्तन महागात..


पुणे : पुण्यातील रीलस्टार संतोष पंडितला एका महिला पत्रकारासोबत केलेली असभ्य वागणूक चांगलीच महागात पडली आहे.आता महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पंडितवर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मानवतेच्या आणि ज्ञान पाजळणाऱ्या रील्स तयार करून समाज प्रबोधन करणाऱ्या पंडितवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित याने महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरुन अश्लील शेरेबाजी केली. तसंच त्याने त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ कैद केला.सामाजिक कार्यकर्त्या संगिता तिवारी या नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलन करत होत्या. यावेळी पत्रकार या नात्याने आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थित होत्या.यावेळी संतोष पंडित त्याठिकाणी आला.’तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे म्हणून पत्रकारांविषयी अर्वाच्च भाषा वापरुन शिवीगाळ केली.

तसेच पंडित यांनी आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या आंदोलन कर्त्या महिलांचे अंगावर धावून जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली.या प्रकरणी पंडितवर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास सुरू असून संतोष पंडित याच्या विरोधात इतर लोकांच्या काही तक्रारी असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!