पुण्याची वनसंपदा धोक्यात? पुणे कॅन्टोन्मेंटबाबत मोठा निर्णय होणार, चर्चा सुरू…!

पुणे :पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. हा भाग महापालिकेत नाही, त्याठिकाणी कॅन्टोन्मेंन्ट कायदा लागू असल्याने अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. यामुळे याठिकाणी वातावरण चांगले असते.
असे असताना हे क्षेत्र पालिकेत समाविष्ट केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा भाग पुणे शहराचे फुप्फुस असून, महापालिकेत समाविष्ट केल्यास त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहतील. परिणामी, शहराचे आरोग्य धोक्यात येईल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, जीएसटी लागू झाल्यामुळे बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे विकासकामांना खो बसला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत चटई क्षेत्र निर्देशांकावर (एफएसआय) बंधने घालण्यात आली. यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत.
तसेच जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासावरही काही प्रमाणात निर्बंध आहेत. अनेकांनी आपल्या राहत्या घरांना दुकांनामध्ये रूपांतरित केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.