मोक्कातील फरारी गुन्हेगार जंगळ्या सातपुतेला उरुळी कांचन येथून अटक; युनिट- १ ने आवळल्या मुसक्या…!


पुणे : पुणे शहरातील कुख्यात व मोक्यातील फरार गुन्हेगार जंगळ्या सातपुते यास मोठ्या शिफातीने पुणे पोलिसांनी उरुळी कांचन येथून जेरबंद केले आहे.

फिर्यादी योगीराज जाधव (गंजपेठ, पुणे) यास वस्तीमध्ये राहणाऱ्या उमेश वाघमारे याने गल्लीतुन जोरात गाडी चालवू नको असे सांगीतले असता त्याने ‘मी या वस्तीचा भाई आहे तुला माहित नाही का ? तुला बघून घेतो’  अशी धमकी दिली होती.

त्याकारणावरून सायं. च्या सुमारास फिर्यादी यांचे तोंड ओळखीचा मंदार खंडागळे याने त्यांचा रस्ता आडवून ‘आमचा भाई जंगळ्या सातपुते मर्डरमधून जेलमधून सुटला आहे. त्याने तुज्याकडून ४०,०००/- रू घेवून ये’ असे सांगीतले आहे.

त्यावर फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता ‘तुला अर्ध्यातासात दाखवीतो’ म्हणून त्यानंतर उमेश वाघमारे, आदीत्य बनसोडे, मंदार खंडागळे, कुमार लोंढे व त्याचे साथीदारांनी टोळी प्रमुख विशाल उर्फ जंगळ्या सातपुते याच्या सांगण्यावरून कोयते, लोखंडी रॉड व लाकडी बांबूने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी, खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ३४१/२०२२ भादवि कलम ३०७,३८७,३४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४/२५, महा पो कायदा कलम ३७/१ सह १३५ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्याण आरोपी हे संघटीत गुन्हेगार टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महा संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३(४) अन्वये कलम वाढ करण्यात आले होते.

या गुन्ह्यातील सर्व आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून यातील टोळी प्रमुख विशाल उर्फ जंगळ्या सातपुते हा फरार होता.या आरोपीवर यापुर्वी पुणे शहरात विवीध पोलीस ठाण्यात खुन खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याची तयारी, मारामारी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून सदर आरोपी हा सन २०१३ मध्ये कुनाल पौळ याचे खुनामधील मुख्य आरोपी होता. तो सन २०१३ पासून सन २०२२ पर्यंत येरवडा कारगृह, पुणे येथे होता.

 

दरम्यान, आरोपीचा शोध चालु असताना ((दि. ०५/०४/२०२३)) रोजी आरोपी विशाल उर्फ जंगळ्या सातपुत हा उरुळीकांचन परिसरात लपुन बसल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली होती.

त्यांनी याची बातमी शब्बीर सय्यद यांना कळवीली असता तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदार यांची टीम तयार करुन त्याप्रमाणे (दि. ०५/०४/२०२३) च्या रात्री पासून सोरतापवाडी, कोरेगावमुळ उरुळीकांचन याभागात ठिकठिकाणी शोध घेत असता आरोपी विशाल उर्फ जंगळ्या शाम सातपुते याला उरुळीकांचनमधील गगन आकांशा सोसायटी, पुणे येथून आज (दि. ०६/०४/२०२३) रोजी सकाळी  ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सतिष गोवेकर, सपोआ, फरासखाना विभाग पुणे हे करीत आहेत.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!