पुणेकरांनो लक्षात ठेवा!! आता मुलाने पतंग उडवला तर आईबाप जाणार तुरुंगात, पोलिसांचा मोठा निर्णय, जाणून घ्या…

पुणे : पुण्यात तीन दिवसांपूर्वी नायलॅान मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरूणाला ३२ टाके पडलेत. तर कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे १५ दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन दुपारी घरी परत चालले होते.
दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावर नायलॅान मांज्याने गळ्याला विळखा घातल्याने त्यांचा गळा चिरला. त्यांना तब्बल १५ टाके पडले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पाहता, पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
आता अल्पवयीन मुले नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली. त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीत आपले मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो, यावर पालकांना लक्ष ठेवावे लागणार आहे.
दरम्यान, तसे न केल्यास थेट आई वडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यामुळे आई वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.