पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत असाल तर…५० हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती


पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी एक अनोखी योजना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आणली आहे. जे नागरिक ‘पुणे ट्रॅफिक पोलीस’ ॲपवर वर्षभरात सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंदवतील, त्यांना ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

तसेच पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडलेल्या ६०० वाहनचालकांच्या समुपदेशन सत्रात ही घोषणा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की, नागरिक आपल्या मोबाईलवरून खालील प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनाचे फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकतात.

ट्रिपल सीट दुचाकी चालवणे.
फुटपाथवर वाहन उभे करणे (नो पार्किंग).
फॅन्सी नंबर प्लेट वापरणे.
रॅश ड्रायव्हिंग (बेदरकारपणे गाडी चालवणे).
गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे.
डबल पार्किंग करणे.

हे ॲप सुरू झाल्यापासून पुणेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत १.८० लाख वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी या तक्रारींची पडताळणी करून १.१६ लाख वाहनचालकांविरुद्ध ऑनलाईन चलन जारी केले आहेत.

प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची पोलिसांच्या विशेष टीमद्वारे बारकाईने तपासणी केली जाते, जेणेकरून कोणावरही चुकीची कारवाई होऊ नये. असे याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!