पुणेकरांच्या मागणीला अखेर यश! पुणे आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून सुरु होणार नवीन रेल्वे, जाणून घ्या सविस्तर


पुणे : पुणे शहराचा विस्तार सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत. आता पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या अनुषंगाने पुण्यातील नागरिकांसाठी विशेष गाड्या सुरू केल्या जात आहेत.

कोकणात होळीची धूम सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याहून आणि हडपसर येथून रेल्वे प्रवाशांसाठी काही विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी होळी सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. अनेक जण होळीला आपल्या मूळ गावी परतत असतात आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते.

यामध्ये पुणे – मालदा टाउन आणि हडपसर ते हिसार दरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक नेमके कसे आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेनच्या पुणे ते मालदा टाउन अशी एक आणि मालदा टाउन ते पुणे अशी एक म्हणजेच दोन फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्रं (03426) विशेष ट्रेन पुणे येथून 23 मार्च 2025 रोजी 22:00 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 16:30 वाजता मालदा टाउन येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 03425 ही स्पेशल ट्रेन मालदा टाऊन येथून 21 मार्च रोजी 15:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी अकरा वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

हडपसर-हिसार विशेष ट्रेनच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. हडपसर ते हिसार अशा दोन आणि हिसार ते हडपसर अशा दोन म्हणजे एकूण चार फेऱ्या चालवल्या जाणार आहे. गाडी क्रं (04726) ही विशेष ट्रेन हडपसर येथून दहा मार्च 2025 रोजी आणि 17 मार्च 2025 रोजी 17:00 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी 22:25 वाजता हिसार येथे पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्रं (04725) ही विशेष ट्रेन हिसार येथून 9 मार्च 2025 आणि 16 मार्च 2025 रोजी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजून 45 मिनिटांनी हडपसर येथे पोहोचणार आहे. यामुळे याठिकाणी प्रवास करणाऱ्यासाठी हि एक दिलासादायक बातमी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group